आनंदसूत्रे
आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो.
सुख – दुःख या संवेदना आहेत, आनंद ही अनुभूती आहे. खरा आनंद हा सुख दुःखाच्या पलीकडचा असतो.
आनंद मानण्यावर असतो. आनंद कणाकणानं आणि क्षणाक्षणानं मिळवायचा असतो, आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो!
भूतकाळ मृत असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. म्हणूनच आनंद हा वर्तमानात जगण्यात असतो.
यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत.
आनंद हीच यशाची पहिली पायरी असते.
आनंद हीच यशाची अंतिम कसोटी असते.
इट इज सिम्पल टु बी हॅपी...बट इट इज डिफिकल्ट टु बी सिम्पल.
आपले विचार आपल्याला घडवतात किंवा बिघडवतात.
यशसूत्रे
यश म्हणजे स्वतःतील सर्वोत्तम ते प्रकट करणं.
यश म्हणजे शिखर नव्हे, ती एक सफर असते.
यशानं पात्रता ठरत नसते, पात्रतेनं यश ठरत असतं.
यश मिळवणं सोपं असतं...ते टिकवणं अवघड असतं.
अपयश नसतंच...तो एक टप्पा असतो, अनुभव असतो.
आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि संधी नसेल तर ती निर्माण करा... हेच यशाचं रहस्य आहे.
द हार्डर वी वर्क – द लकिअर वी गेट!
इमिटेशन इज डेथ, एन्व्ही इज इग्नरन्स.
एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो – तो योग्य वेळी घेतला तर!
फक्त यशातच नव्हे...प्रयत्नांतही आनंद असतोच.
तिथं ‘हातोटी’ हतप्रभ होते, तिथं ‘चिकाटी’ बाजी मारून जाते.
पैसा ‘कल्पनेत’ असतो. आयडिया इज मनी.
डोन्ट वर्क फॉर मनी... मेक मनी वर्क फॉर यू.
प्रेमसूत्रे
प्रेम हे एक निमित्त असतं, ‘स्व’ ची ओळख पटण्याचं.
खरं प्रेम हे एकतर्फीच असतं... निरपेक्ष असतं, बिनशर्त असतं
प्रेम म्हणजे मालकी हक्क नव्हे...प्रिय व्यक्तीचा आनंद, एवढीच प्रेमात अपेक्षा असते.
मागून मिळतं ते प्रेम नव्हे...बांधून ठेवतं तेही प्रेम नव्हे.
प्रेम माणसाला बळ देतं. दुबळं बनवत असेल तर ते प्रेम नव्हे.
प्रेमाचा भंग होत नसतो...भंग होता तो अपेक्षांचा.
प्रेमाला पर्याय असतात आणि प्रिय व्यक्तीलाही!
जीव देणं किंवा जीव घेणं हे प्रेम नव्हे... जिवाला जीव देणं, हेच खरं प्रेम असतं.
जो खरं, निरपेक्ष प्रेम करतो – त्यालाच खरं प्रेम मिळू शकतं.
(अधिक सविस्तर व सोदाहरण विवेचनासाठी वाचा – मजेत जगावं कसं?)
