‘मेन आर फ्रॉम मार्स – विमेन आर फ्रॉम व्हीनस’ हे जॉन ग्रे यांचं प्रचंड गाजलेलं पुस्तक, नैसर्गिक फरकामुळे असेल – उत्क्रांतीच्या खुणांमुळे असेल किंवा संस्कारांमुळे असेल – स्त्री आणि पुरुष यांची विचार करण्याची आणि ते व्यक्त करण्याची शैली प्रचंड वेगळी असते. इतकी की पुरुष जणू मंगळावरून आलेले असावेत तर स्त्रिया शुक्रावरून! बोलण्याची भाषा एकमेकांना समजली तरी वागण्याची भाषा समजतच नसल्यानं घराघरात नवरा-बायकोची भांडणं होत राहतात.
शिवाय भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच, हे गृहीत धरलेलं असतं. भांडण्यामुळे नात्यातली खुमारी वाढते... भांडायचं नसलं तर लग्न करायचंच कशाला... इथपर्यंत समज असतात.
स्त्री पुरुष ‘समान’ असेल तरी ‘सारखे’ नसतात, हे विसरलं जातं आणि तिथंच गाडं घसरतं.
हाच विषय नाट्यातून आणि अर्थातच खुमासदार विनोदांतून मांडण्याच्या कल्पनेतून ‘भांडा सख्य भरे’ अवतरलं.
झलक (भांडा सख्य भरे)
