प्रेरक साहित्य - यशस्वी व्हावं कसं ?

आयुष्यात यशस्वी कोण होतं ?
आधुनिक संशोधन असं सांगतं की
यशामध्ये व्यक्तीच्या बुद्ध्यन्काचा
वीस टक्के वाटा असतो
तर भावनिक बुद्धिमत्तेचा ऐंशी टक्के .
भावनिक बुद्धिमत्ता अर्थात भावप्रज्ञा
हीच असते यशाची गुरुकिल्ली .
आनंदाची बातमी अशी की
बुद्ध्यंक आयुष्यभर तोच असतो
भावप्रज्ञा मात्र विकसित करता येते.
साध्या, सोप्या ,रंजक शैलीत
पुस्तकाच्या पानापानातून उलगडत जाणारे
भावप्रज्ञेचे विविध पैलू विकसित करा
आणि करिअर मधेच नव्हे
तर आयुष्यातही यशस्वी व्हा !
शिवराज गोर्ले यांस-
वाचक लिहितात..
सर, मी आयटी क्षेत्रात काम करणारा इंजिनिअर आहे यापूर्वी ‘यशा’वर अनेक पुस्तकं वाचली होती – काही व्याख्यानेही ऐकली होती. मला स्वतःला ते फारच वरवरचं वाटलं होतं.
म्हणूनच तुमचं ‘यशस्वी व्हावं कसं?’ हे पुस्तक वाचतानाही थोडा साशंकच होतो. पण थँकफुली, तुमच्या पुस्तकानं निराशा नाही केली. तुमचं पुस्तक अगदीच वेगळं, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी आहे. अंतर्मुख करणारं आहे. बिल गेटस आणि मायकेल जॅक्सन ही तुलनाही खूपच बोलकी आहे. ‘भावप्रज्ञे’ची गुरुकिल्लीच तुम्ही आमच्या हाती दिली आहे. सर - थँक्स फॉर सच अ थॉट प्रोव्होकिंग बुक!
आपला,
निरंजन सुलाखे
औंध